नातेपुते महाविद्यालयात अँटी रॅगिंग संबंधित पोस्टर सादरीकरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

नातेपुते महाविद्यालयात अँटी रॅगिंग संबंधित पोस्टर सादरीकरण

 नातेपुते महाविद्यालयात अँटी रॅगिंग संबंधित पोस्टर सादरीकरण



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते येथे अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या परिपत्रकानुसार अँटीरॅगिंग प्रतिज्ञापत्र व अनुपालन सादर करण्याच्या सुधारित प्रक्रियेबाबत अँटी रॅगिंग संबंधित पोस्टर सादरीकरण करण्यात आले. रॅगिंग हा शैक्षणिक संस्थांच्या आत किंवा बाहेर विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक शोषण करणारा एक गंभीर आणि कायदेशीर गुन्हा व दंडात्मक अपराध आहे
विद्यापीठ अनुदान आयोग ( यूजीसी) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगला पूर्णपणे प्रतिबंध आसल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची काहीअडचण असेल तर त्यांनी अँटी रॅगिंग प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म भरावेत याबद्दल माहिती देऊन सूचना केल्या.सदर कार्यक्रमास प्रा.पुष्पा सस्ते, प्रा.प्रमिला राजगुरू,प्रा.डॉ.कमल कांबळे प्रा.डॉ. साळुबाई जाधव, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतीश पाटील, कार्यालयीन प्रमुख एच.टी.वाघमोडे,कार्यक्रमाचे प्रस्ताविक कमिटीच्या सचिव प्रा.डॉ.सुनीता सूर्यवंशी यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.उत्तम सावंत यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages