यशराज संस्थेचे कार्य कौतुकास्पद, बालसंगोपन योजनेतून गरजूंना न्याय मिळेल - खा. धैर्यशील मोहिते-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

यशराज संस्थेचे कार्य कौतुकास्पद, बालसंगोपन योजनेतून गरजूंना न्याय मिळेल - खा. धैर्यशील मोहिते-पाटील

 यशराज संस्थेचे कार्य कौतुकास्पद, बालसंगोपन योजनेतून गरजूंना न्याय मिळेल - खा. धैर्यशील मोहिते-पाटील





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- यशराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने टेंभुर्णी शहर व परिसरातील गरजू लाभार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात आई किंवा वडील मयत झालेल्या बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत दरमहा २,२५० रुपये शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "यशराज बहुउद्देशीय संस्थेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माजी सरपंच प्रमोद कुटे व माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे यांनी गरजू मुलांसाठी हाती घेतलेले हे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे. या बालसंगोपन योजनेतून खऱ्या अर्थाने गरजूंना न्याय मिळेल आणि एकही बालक वंचित राहणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सर्वेसर्वा माजी सरपंच प्रमोद कुटे यांनी केली. आजपर्यंत संस्थेने १७० लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला असून आजच्या शिबिरात २३० नवीन प्रस्ताव जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आमदार अभिजीत आबा पाटील म्हणाले, "शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे, जी यशराज संस्था करत आहे." शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे म्हणाले, "या उपक्रमामुळे अनाथ बालकांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. अशा कार्याला आमचा नेहमीच पाठिंबा राहील."महात्मा फुले विद्यालयाचे संस्थापक नारायण भानवसे म्हणाले, "२,२५० रुपयांच्या मदतीमुळे अनेक मुलांचे शिक्षण थांबणार नाही. संस्थेचे हे कार्य सामाजिक बांधिलकी जपणारे आहे."

या कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर साहेब, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. भरणे, महिला व बाल विकास जिल्हाधिकारी अविनाश मगर, मंडल अधिकारी सुजित शेळवणे, तलाठी घाडगे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सायली माळी, वैभव बापू कुटे, विलास देशमुख, भाऊसाहेब महाडिक, विजय कोकाटे, डॉ. राहुल पाटील, बलभीम लोंढे, चंद्रकांत कुटे अनिल देवकर, सुनील कोळेकर, नितीन चव्हाण, शुभम कांबळे, सौरभ कुटे, शैलेश कुटे, संतोष लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मोठ्या संख्येने लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कुटे, सिद्धेश्वर लोंढे, सोमा कुटे, प्रताप कुटे, जावेद मुलानी,

 व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमलेश्वर विद्यालय बेंबळेचे माजी प्राचार्य अशोक बागवाले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नितीन कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages