आजाराने श्रीकांत गायकवाड यांचे निधन; शनिवारी मोहोळ येथे अंत्यसंस्कार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- येथील सोमराय नगर परिसरातील रहिवासी श्रीकांत तुळजाराम गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सोमराय नगर, मोहोळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर पुणे रोडवरील बीएसएनएल कार्यालयाशेजारील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
श्रीकांत गायकवाड यांनी राजकारणात व समाजकारणात चांगले योगदान दिले आहे.
श्रीकांत गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, व पत्नी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment