'हर्र बोला हर्र...' च्या जयघोषात निघाली ६८ लिंग पदयात्रा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 51 व्या वर्षीही तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली.
प्रात:काळी निघालेल्या पदयात्रेत भक्तगणांनी हर्र बोला हर्र... चा जयघोष करीत राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच पावसासाठी साकडे घालण्यात आले. बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली व ६८ लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव व्हिजनचे संस्थापक सहसचिव संजय साखरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, अरुण पाटील, मन्मथ कपाळे, गंगाधर झुरळे, शांतवीर बसवंती, शेखर गुजले, महादेव कलशेट्टी, प्रशांत गंचिनगोटे, किरण अजिंखाने, सुब्रमणी लोणारे, विश्वनाथ राठोड, परमेश्वर शहापुरे (पुणे), प्रतिक हारके, सिद्धाराम वच्चे, शिवशंकर जंगम, प्रतिभा चौगुले, रेणूका ओजल, अर्चना लिंगराज, संगिता झेंडे, योगिता आयगोळे, उमा आयगोळे, कांचन हुलसुरे, रुपाली वाघमारे, माहेश्वरी वाघमारे, लक्ष्मी कालदीप, लता कणसे, सरिता पवार, लक्ष्मी गायकवाड, किरण अंजिखाने, वैशाली मुचंडे, ज्योती पाटील, अन्नपूर्णा कोळी, शारदा करकम, अंजली तलवार, अश्विनी भसाडे, वैष्णवी आलूरे, मेधा बिराजदार, गुरुदेवी कानडे (अक्कलकोट), श्रेयश राजमाने आदी भक्तगण सहभागी झाले होते.
सकाळी ७ वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पदयात्रेचा समारोप दुपारी ३ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला. पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालय येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले. तर समारोपाच्या ठिकाणी वीरशैव व्हिजनतर्फे पदयात्रेकरूंना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे-स्वामी, बसवराज बेऊर, धानेश सावळगी, मल्लिनाथ सोड्डे, महेश गुड्डद, दीपक पटणे, महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.
चौकट : पहिल्यांदाच केली पदयात्रा
माहेश्वरी वाघमारे, राधिका अंगेरी, श्रुती गंगेरी, द्राक्षायणी अतने, हणमंत अतने, मीनाक्षी बशेट्टी, वंदना मस्कले, प्रतिभा चौगुले, रेश्मा पवार, वैष्णवी जावळे या सिद्धेश्वर भक्तांनी केली पहिल्यांदाच 68 लिंग पदयात्रा

No comments:
Post a Comment