न्यासाकडून अध्यात्म, सेवा आणि मानवतेची भावना दृढ करणारे कार्य- किशोर गांगुर्डे
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून अध्यात्म, सेवा आणि मानवतेची भावना दृढ करणारे कार्य होत असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा संचालक (माहिती) उप मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई किशोर गांगुर्डे यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सहपरिवार आले असता न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होते.
यावेळी बाळासाहेब पोळ, शहाजी यादव, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, नवनीत पाटील, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment