मेजर ध्यानचंद यांची जयंती अनगर प्रशालेत उत्साहात साजरी
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची तसेच हॉकी क्षेत्रातील योगदानाची माहिती देण्यात आली.
“आपल्याला निरोगी राहायचे असेल आणि उत्तम स्वास्थ्य टिकवायचे असेल, तर नियमित व्यायाम व क्रीडेमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मैदानाशी नाते जोडावे,” असे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राचार्य महादेव चोपडे यांनी केले. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य माधव खरात, कला विभागप्रमुख रमेश चव्हाण, विलास गुंड, क्रीडाशिक्षक दाजी गुंड, क्रीडाशिक्षक चंद्रकांत सरक, सोमनाथ ढोले, बापूराव घुले, असलम मुलानी, महादेव भडकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी उत्साह निर्माण झाला.

No comments:
Post a Comment