महिला कर्मचारी लैंगिक छळवणूक तक्रार निवारण समितीवर ॲड. विशाल घोलप यांची नियुक्ती
करमाळा (कटूसत्य वृत्त):- जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या आदेशानुसार पंचायत समिती करमाळा येथील गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर कार्यरत महिला कर्मचारी लैंगिक छळवणूक तक्रार निवारण समितीवर (विशाखा समिती) विधितज्ञ सदस्य म्हणून ॲड. विशाल दादासाहेब घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने अशा समित्यांची भूमिका महत्त्वाची असते. संबंधित तक्रारींची योग्य पद्धतीने दखल घेणे, आवश्यक कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करणे तसेच कार्यस्थळी महिलांना सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे यासाठी समितीच्या माध्यमातून काम केले जाते.
पंचायत समिती करमाळा येथील गटविकास अधिकारी यांच्या स्तरावरील या समितीवर विधिज्ञ सदस्य म्हणून ॲड. विशाल घोलप यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कायद्याचे ज्ञान व विधीविषयक अनुभवाच्या माध्यमातून समितीच्या कार्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ॲड. विशाल दादासाहेब घोलप यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments:
Post a Comment