करमाळा होमगार्ड पथकात रक्षाबंधन उत्साहात साजरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

करमाळा होमगार्ड पथकात रक्षाबंधन उत्साहात साजरे

करमाळा होमगार्ड पथकात रक्षाबंधन उत्साहात साजरे




करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा होमगार्ड पथकात बहिण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सार्जंट महिला होमगार्ड जयश्री कांबळे, सेक्शन लीडर सारिका बिडकर, प्रभा दीक्षित, किशोरी शेंडगे, सरोजनी परदेशी, शैला बुटे, सुवर्णा गायकवाड आणि मनिषा कांबळे यांनी करमाळा होमगार्ड पथकातील सर्व पुरुष होमगार्डना बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेली रेशमी धाग्याची राखी बांधली. यामुळे होमगार्ड सदस्यांमधील आपुलकीचे आणि बंधुत्वाचे नाते अधिक दृढ झाले. यावेळी होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी, पलटन नायक दीपक जव्हेरी, पलटन नायक महेश शहाणे, सार्जंट प्रविण महिंद्रकर, सेक्शन लीडर संदिप परदेशी, सोभनाथ ढेपे, पंकज अंदुरे, अ. सेक्शन लीडर दीपक घाडग, सद्दाम तांबोळी, होमगार्ड संभाजी कोळेकर, संतोष कुकडे, जावेद काझी, नारायण वायकुळे, संजय कोळेकर, आशोक कांबळे, गणेश साखरे, राहुल पवार, अतुल महाडिक, तुकाराम सोरटे, शकिल पठाण, गणेश शहाणे, ज्ञानेश्वर मचाले, अमोल गणगे, समाधान हानपुडे, विशाल नलवडे, तेजस महारनवर, बिभीषण टकले, नवनाथ मोरे, प्रदीप लाळगे आदी होमगार्ड तसेच सेवानिवृत्त सेक्शन लीडर होमगार्ड दादा शिंदे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित होमगार्डना मार्गदर्शन करताना तालुका समादेशक अधिकारी सचिन जव्हेरी म्हणाले की, होमगार्ड संघटनेतील सदस्यांमध्ये जोश आणि उत्साह वाढावा, यासाठी पथकात वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपले होमगार्ड पथक हा एक परिवार समजून आपण सर्वजण काम करत असल्याने, महिला व पुरुष होमगार्ड यांच्यातील बंधुत्व आणि आपुलकी वाढविणारा रक्षाबंधन हा सण आहे. या सणामुळे होमगार्ड संघटनेतील एकोपा, शिस्त तसेच संघटनेचे ध्येय-धोरण जपणे अधिक सोपे होणार आहे. महिला होमगार्ड भगिनींनी राखी बांधल्यामुळे आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी होमगार्ड संघटनेची शिस्त, शिकवण, ध्येय-धोरणे, आदर्श तसेच आदेश व सूचनांचे आणि बंधुत्वाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जव्हेरी यांनी केले.

----चौकट-----
महिला होमगार्ड भगिनींना साडी-चोळीची भेट...
करमाळा होमगार्ड पथकातील सर्व पुरुष होमगार्डनी स्वयंस्फूर्तीने महिला होमगार्डना भावाची भेट म्हणून मानाची साडी-चोळी भेट दिली. ही भेट स्वीकारताना महिला होमगार्ड भगिनी भावुक झाल्या. त्यांनी आनंदाने ही भेट स्वीकारून या अतूट नात्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages