धोत्री प्रशालेचे पर्यवेक्षक देगांवकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

धोत्री प्रशालेचे पर्यवेक्षक देगांवकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

 धोत्री प्रशालेचे पर्यवेक्षक देगांवकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार




धोत्री (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सचिन देगांवकर यांचा सेवानिवृत्तीनिमित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सचिन व सीमा देगांवकर यांचा पुर्ण अहेर,शाल, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैष्णवी कागे या विद्यार्थिनीने सेवानिवृत्ती गीत सादर केले. सृष्टी वाघमारे, कलावती कुंभार,भानुदास राठोड, पंचय्या स्वामी, मुख्याध्यापक गिरमल बुगडे यांनी देगांवकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. देगांवकर म्हणाले, संस्थेने, शाळेने, पालकांनी, सहकारी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रेम दिल्यामुळे आज आनंदाने सेवानिवृत्त होत असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर बृहन्मठ होटगी संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे, शालेय समितीचे सदस्य शिवशरण बिराजदार,विठ्ठल रामपुरे , हणमंत चौगुले, राजकुमार पाटील, बसप्पा पाटील, भिमशा पाटील,राणी व्हटकर, सोमनाथ स्वामी, सैपन शेख, सिद्धय्या स्वामी, षडाक्षरी स्वामी, राम ढाले,धनंजय नकाते, अमोगसिद्ध बिराजदार, श्रीशैल व्हनमाने, महादेव व्हनमाने, मल्लेशा व्हनमाने, यल्लप्पा व्हनकडे,प्रकाश कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आकांक्षा पोशनगीर, अक्षय देगांवकर,विनायक चित्रावकर,दिपक गवसाने, आप्तेष्ट,सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राजशेखर व्हनकडे यांनी केले तर मल्लिकार्जुन गुरव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटू,चंद्रकांत स्वामी, भीमाशंकर बिराजदार, शेखर पाटील,महेश हांडगे, बाबुराव फुलारी आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages