सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

 सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथील सहा विद्यार्थिनींची भूतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गर्ल्स गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप २०२६ साठी भारतीय अंडर-१५ मुलींच्या संघात निवड झाली आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हा संघ भूतानकडे रवाना झाला आहे.

भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये जान्हवी पूजा बुराडे, मृण्मयी योगीराज होनपारखे, हर्षिता दयानंद होनपारखे, विदिशा दिनेश आंबोरे, ब्राह्मी दिनकर चौधरी आणि शिवान्या गणेश गुंड यांचा समावेश आहे. या खेळाडूंना भारतीय संघाचे प्रशिक्षक तसेच सिंहगड पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक राजू ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा २४ ते २७ ऑगस्ट २०२६ दरम्यान भूतान येथील इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेत सहाही खेळाडू भारतीय अंडर-१५ मुलींच्या संघातून सहभागी होणार असून भारतासह सिंहगड पब्लिक स्कूलचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

संजय नवले यांच्याकडून अभिनंदन

या निवडीबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सहाही खेळाडूंचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि सिंहगड पब्लिक स्कूलचा नावलौकिक वाढवावा, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे आणि आत्मविश्वासाने देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

“भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची बाब आहे. मेहनत, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वासाच्या बळावर या खेळाडूंनी भूतानमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देशाचा तिरंगा अभिमानाने उंच फडकवावा,” असे संजय नवले यांनी सांगितले.

या यशाबद्दल प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, क्रीडा विभाग प्रमुख व प्रशिक्षक राजू ठाकूर, शिक्षकवृंद आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय संघात झालेली निवड ही शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. आता या खेळाडूंच्या कामगिरीकडे सिंहगड परिवारासह क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages