महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रतापगड अकलूज येथे महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या सोलापूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी विविध पदाधिकांची निवड करण्यात आली.मोहिते-पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकारी शिरीष विष्णू जगदाळे (शहर अध्यक्ष),प्रशांत सुधाकर देशमुख (शहर उपाध्यक्ष) अजित आबाजी पाटील (शहर उपाध्यक्ष),दिलीप रामलाल निंबाळकर (शहर संघटक),ज्योतिबा सौदागर गुंड (कार्यकारिणी सदस्य),अजय अरुण सोमदळे (कार्यकारिणी सदस्य अशी पदाधिकारी आहेत.
जनसेवेचा विचार,संघटनेची ताकद आणि समाजहिताचा संकल्प घेऊन आपल्या जबाबदारीने न्याय देत संघटनेच्या कार्याला अधिक बळ देणार आहोत अशी नवनियुक्त पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जनसेवा संघटना जिल्हा सरचिटणीस दीपक पिंजारे,जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जाधव दादासाहेब नामदास राहुल जाधव संदिप कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment