डॉ. रंगनाथन यांचे आधुनिक ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून उल्लेखनीय योगदान- मल्लिनाथ कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले, ग्रंथालयाचे व्यवस्थापन सुलभ व्हावे यासाठी विविध पद्धती विकसित केल्या. त्यांची कोलन क्लासिफिकेशन ही ग्रंथवर्गीकरण पद्धती जगभर प्रसिद्ध झाली, म्हणून ते ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ग्रंथालय शास्त्रासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील ग्रंथालय समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे प्रा. राजशेखर पवार, डॉ बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, रंगनाथन यांनी भारतात सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठीही मोठे योगदान दिले. भारतीय ग्रंथालयशास्त्राला स्वतंत्र ओळख मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा. सौरभ भस्मे यांनी केले आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापिका मनीषा शिंदे, हर्षदा गायकवाड, डॉ. शीतल झिंगाडे, सोनाली कटकधोंड, जनाबाई चौधरी, मनीषा तारापुरे, मधुबाला लोणारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment