सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 29, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी अभियान

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी अभियान






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच दृष्टीदोषांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने  सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर येथे शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या अभियानांतर्गत डॉ. गायत्री कदम, डॉ. मोहित पठाण आणि डॉ. प्रियांका कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक नेत्र तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची दृष्टी क्षमता तपासणे, संभाव्य दृष्टीदोषांचे निदान करणे तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करणे यावर विशेष भर देण्यात आला.

मोबाईल, संगणक, स्मार्ट बोर्ड तसेच अन्य डिजिटल साधनांचा विद्यार्थ्यांकडून वाढता वापर लक्षात घेता डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. स्क्रीनकडे पाहताना योग्य अंतर राखणे, ठराविक वेळेनंतर डोळ्यांना विश्रांती देणे, पुरेशा प्रकाशाचा वापर करणे आणि संतुलित आहार घेणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, नियमित नेत्र तपासणीचे महत्त्वही अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कौतुक केले.

या अभियानाचे यशस्वी आयोजन सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

नेत्र तपासणी अभियानासाठी सहकार्य केल्याबद्दल शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages