अनगर येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्यावर शिक्षक कार्यशाळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

अनगर येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्यावर शिक्षक कार्यशाळा संपन्न

 अनगर येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्यावर शिक्षक कार्यशाळा संपन्न




अनगर (कटूसत्य वृत्त):- श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, अनगर यांच्या वतीने ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा २०२६’ अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बीजभाषणाने कार्यशाळेची सुरुवात झाली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक सक्षमीकरण, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कृतीआधारित उपक्रमांचे नियोजन तसेच शाळेच्या भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी कार्यवाहीचा आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, प्राचार्य महादेव चोपडे, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय डोंगरे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी,प्राचार्य महादेव चोपडे, महादेव पवार, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय डोंगरे, सुजितकुमार पासले, रमेश चव्हाण, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. विशाल कदम,प्रकाश शेटे, डॉ. रवी देशमुख, नितिन गुंड,अनिता लांडगे,मनिषा गुंड आदींनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर माधव खरात यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages