नेताजी प्रशालेत राखी कार्यशाळा उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

नेताजी प्रशालेत राखी कार्यशाळा उत्साहात

 नेताजी प्रशालेत राखी कार्यशाळा उत्साहात



सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  श्रमजीवी नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त राखी बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
या कार्यशाळेत ५२ विद्यार्थ्यांनी स्व खर्चाने रंगीबेरंगी मणी, झरी, टिकल्या व आकर्षक धाग्यांचा वापर करून सुंदर व कल्पक राख्या तयार केल्या. शिक्षकांनी राखी बनवण्याचे विविध तंत्र व बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
स्वतःच्या कल्पनेतून राख्या साकारताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व हस्तकौशल्याला चालना मिळाली. त्याचबरोबर बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा आणि रक्षाबंधन सणाचा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे शाळेत प्रदर्शन भरवण्यात आले. उद्या शुक्रवार दि.२८ रोजी रक्षाबंधनानिमित्ताने या राख्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी व बहिण भावाचे अतुट प्रेमळ नाते प्रस्थापित करण्यासाठी बांधणार आहेत.
या कार्यशाळेचे आयोजन कलाशिक्षक एस. एस. स्वामी यांनी केले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक राख्यांचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकर सुंकनपल्ली, आरती कुंभार,स्वाती पोटाबत्ती यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ
> सोलापूर : नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलमध्ये आयोजित राखी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages