विद्या विकास प्रतिष्ठानमध्ये ग्रंथप्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

विद्या विकास प्रतिष्ठानमध्ये ग्रंथप्रदर्शन

 विद्या विकास प्रतिष्ठानमध्ये ग्रंथप्रदर्शन

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त): डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीव्हीपीआयटीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरुण गायकवाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुनीलदत्त कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुनीलदत्त कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून पुस्तक वाचनाकडे वळण्याचे आवाहन केले. सॉफ्ट कॉपी वाचण्यापेक्षा ग्रंथालयातून पुस्तके घेऊन त्यांचे नियमित वाचन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रंगनाथन यांनी मांडलेल्या ग्रंथालयाच्या पाच सिद्धांतांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरुण गायकवाड यांनी ग्रंथप्रदर्शनासारखे उपक्रम सातत्याने आयोजित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल चंद्रकांत नवत्रे यांनी केले. यावेळी विभागप्रमुख साईकृष्ण चव्हाण, अनिरुद्ध पेठकर, प्रसाद वळसंगे, मकरंद बुद्धे, किरण वाघ, रेखा बिराजदार आदी उपस्थित होते.

ग्रंथपाल दिनानिमित्त संस्थाध्यक्ष अमोल चव्हाण आणि संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रा. अनिल अवधूत यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages