भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ३१ रक्तदात्यांचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ३१ रक्तदात्यांचे रक्तदान

 भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; ३१ रक्तदात्यांचे रक्तदान




मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- श्रीहरी सार्वजनिक वाचनालय, वडाचीवाडी ता. मोहोळ यांच्या वतीने सामाजिक न्याय हक्कासाठी या संकल्पनेतून लोकनेते बाबुराव आण्णा पाटील व कै. हरिदास सुरवसे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरात ३१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

शिबिराचे उद्घाटन अक्षय ब्लड बँकेचे उदय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना, "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदानाचा संकल्प करावा," असे आवाहन केले.

श्रीहरी सार्वजनिक वाचनालय, वडाचीवाडी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील युवक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले.

या रक्तदान शिबिरात गणेश विश्वनाथ म्हमाणे, लक्ष्मण लिंबा पाटेकर, सिध्देश्वर सुभाष सुरवसे, योगेश दशरथ चौधरी, अशोक पांडूरंग बचुटे, उमेश रामलिंग नाईकवाडी, प्रविण दत्तात्रय बचुटे, विजय भगवान सरवदे, बाळासाहेब ज्ञानोबा पासले, बाळासाहेब महादेव नाईकवाडी, विशाल माणिक थिटे, शिवाजी भागवत सरवळे, आकाश दत्तात्रय बचुटे, बालाजी रामचंद्र कदम, अशोक चंद्रकांत लोंढे, पांडूरंग हरिदास सुरवसे, शशीपाल मधुकर म्हमाणे, नेताजी राजाराम सुरवसे, सौ. सुनिता बाळू जाधव, संजय शंकर निचळ व रविंद्र सुर्यभान नागटिळक यासह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन सुयश दूध संकलन केंद्र तसेच नेताजी राजाराम सुरवसे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पांडुरंग सुरवसे, सुहास म्हमाणे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

रक्तदानाच्या माध्यमातून समाजात मानवतेचा संदेश देत गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages