सोलापूरच्या कन्या सौ. सोनाली राहुल डोईजड - नायकू यांचा ‘युवा समाजभूषण पुरस्कार २०२६’ने गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

सोलापूरच्या कन्या सौ. सोनाली राहुल डोईजड - नायकू यांचा ‘युवा समाजभूषण पुरस्कार २०२६’ने गौरव

 सोलापूरच्या कन्या सौ. सोनाली राहुल डोईजड - नायकू यांचा ‘युवा समाजभूषण पुरस्कार २०२६’ने गौरव




पिंपरी (कटूसत्य वृत्त):- घर, पती, दोन मुलांची जबाबदारी, नोकरी आणि स्वतःची स्वप्ने यांचा समतोल साधत अथक मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सोलापूरच्या कन्या सौ. सोनाली राहुल डोईजड नायकू यांना लिंगायत गवळी विकास फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘युवा समाजभूषण पुरस्कार – २०२६’ आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे प्रदान करून गौरविण्यात आले.

सोनाली यांनी BCA आणि MBA (HR & Systems) शिक्षण पूर्ण केले. करिअरच्या वाटचालीत मंदीचा काळ, नोकरीतील खंड, स्पर्धा परीक्षांमधील अपयश आणि त्यानंतर आलेल्या मातृत्वाच्या जबाबदाऱ्या अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली.

नोकरीसोबत दोन मुलांचे संगोपन, घराची जबाबदारी आणि करिअर यांचा समतोल साधताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेकदा स्वतःचा थकवा बाजूला ठेवून कुटुंब आणि करिअर या दोन्ही आघाड्यांवर त्या ठामपणे उभ्या राहिल्या. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द त्यांनी कधीही सोडली नाही.

या प्रवासात त्यांचे पती आणि दोन मुलांची साथ, तसेच सासूबाईंचा खंबीर आधार त्यांच्यासाठी अत्यंत मोलाचा ठरला. त्याचबरोबर त्यांचे काका अनिलजी नायकू, चेअरमन – सोलापूर गवळी समाज सहकारी पतसंस्था यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आधारही त्यांच्या वाटचालीत महत्त्वाचा ठरला.

आज त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित म्हणून त्या Fujitsu या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये Project Management Officer (PMO) म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत.

सोनाली यांचा प्रवास म्हणजे केवळ एका महिलेच्या यशाची कहाणी नाही; तो आहे नारीशक्तीचा, मातृत्वासोबत करिअर घडविणाऱ्या आईचा, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या पत्नीचा आणि परिस्थितीसमोर न झुकणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रीचा प्रेरणादायी प्रवास.

“यश हे नशिबाचे नसते, ते असते जिद्द, परिश्रम आणि संस्कारांचे फळ!” या विचाराला त्यांनी आपल्या जीवनातून सार्थ ठरवले आहे.

यावेळी माजी नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, प्रकाश चौधरी, वामन आप्पा काटकर, प्रा. संभाजी बारसे तसेच लिंगायत गवळी विकास फाउंडेशन, पुणेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सोलापूरच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक कॉर्पोरेट विश्वापर्यंत पोहोचला आहे. ही केवळ यशाची कहाणी नाही; ही आहे संघर्षाची, कुटुंबाच्या साथीची आणि आपल्या स्वप्नांसाठी अखंड झटणाऱ्या एका नारीशक्तीची प्रेरणादायी गाथा!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages