नोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

नोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



करमाळा, (कटूसत्य वृत्त):-   नोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक गणपत बुधवंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून ज्ञानबा इरकर, नितीन राठोड, आनंद खोत, ऐजाज अंगर्षा, प्रशांत भोसले आणि शाळेचे माजी विद्यार्थी शुभम अनारसे उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. शाळेचे माजी मुख्याध्यापक गणपत बुधवंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, देशभक्तिपर गीतांवर नृत्य, कवायत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगतेही व्यक्त केली.
     कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages