मुलींच्या शिक्षणासाठी समग्र शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- खा. डॉ. ज्योतीताई वाघमारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

मुलींच्या शिक्षणासाठी समग्र शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- खा. डॉ. ज्योतीताई वाघमारे

 मुलींच्या शिक्षणासाठी समग्र शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- खा. डॉ. ज्योतीताई वाघमारे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यसभेतील तारांकित प्रश्न क्रमांक १८७ द्वारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी समग्र शिक्षण अभियान आणि लैंगिक समावेशन निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधले. ग्रामीण, आदिवासी, मागास आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच मुलींच्या शिक्षणाला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने त्यांनी हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, समग्र शिक्षण ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यांच्या सहभागातून तिची अंमलबजावणी केली जाते. शाळांच्या गरजेनुसार पायाभूत सुविधा, वर्गखोल्या, शैक्षणिक साहित्य आणि इतर विकासकामांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्राला २०२५-२६ या आर्थिक वर्षात शालेय पायाभूत सुविधांसाठी ३९८.०६ कोटी रुपये, तर २०२६-२७ मध्ये ३९०.७५६ कोटी रुपयांचा केंद्रीय निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्राने दिली. याशिवाय, विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची संख्या कमी करण्यासाठी नवीन शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांचा विस्तार, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व वसतिगृहे, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, वाहतूक सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा, व्यावसायिक शिक्षण आणि आयसीटी सुविधांसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी संसदेत हा विषय उपस्थित करून ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी प्रभावी भूमिका बजावली. शिक्षणातील समान संधी, मुलींचे सक्षमीकरण आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे या प्रश्नातून पुन्हा अधोरेखित झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages