गुणवंत विद्यार्थी हेच समाजाचे भूषण : रामप्पा चिवडशेट्टी
गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मान
सोलापूर (कटूसत्य वृत्तसेवा) : तरुण पिढीचे भवितव्य हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचे फलित असते. देश, देव आणि समाजाप्रती जाणीव ठेवून कार्य केल्यास समाजाची प्रगती साध्य होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजाचे ऋण फेडण्याची भावना मनात ठेवावी, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी केले.
वीरशैव सेवा मंडळ पूर्व विभाग, सोलापूर यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
चिवडशेट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या उन्नतीसाठीही करावा. संस्कार, शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधणारी तरुण पिढीच सक्षम समाजाची निर्मिती करू शकते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रभाकर हंगे यांनी केले. यावेळी नगरसेवक शिवानंद पाटील आणि भाजपा युवा आघाडीचे अध्यक्ष महेश बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास काशिनाथ रुगे, संगमेश्वर पायमल्ले, सुरेश चिक्कळी, विजयकुमार हुल्ले, शंकर पावरगी, विश्वनाथ मेरकर, राजशेखर मळेवाडी, वसंतराव परांडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment