नेताजी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

नेताजी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

 नेताजी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य रविशंकर कुंभार होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, क्रीडा प्रमुख विठ्ठल कुंभार, सूर्यकांत बिराजदार, गणपती पाटील, अशोक पाटील , विश्वराध्य मठपती , शीतल पाटील,  विनायक कोरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य रविशंकर कुंभार म्हणाले ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळात शिस्त,आत्मविश्वास, नेतृत्व, संघभावना, संयम आणि खिलाडूवृत्तीला महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध क्रीडा प्रकारांत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अंगभूत कौशल्याला योग्य दिशा द्यावी.मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले. प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages