सामाजिक कार्याबद्दल ॲड. राजन दीक्षित यांचा सपत्नीक सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 15, 2026

सामाजिक कार्याबद्दल ॲड. राजन दीक्षित यांचा सपत्नीक सत्कार

 सामाजिक कार्याबद्दल ॲड. राजन दीक्षित यांचा सपत्नीक सत्कार




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साप्ताहिक अनंत विचार परिवाराच्या वतीने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) पंढरपूर येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. जळगावकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्याबद्दल ॲड. राजन दीक्षित यांचा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

समाजातील विविध जाती-धर्मांतील तसेच साहित्य, लेखन, क्रीडा, चित्रपट, सामाजिक सेवा, शिक्षण, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून समाजहितासाठी योगदान देणारे ॲड. राजन दीक्षित यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन हा गौरव करण्यात आला.

यावेळी ह.भ.प. जळगावकर महाराज यांनी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. समाजाच्या जडणघडणीत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक, कलाकार, खेळाडू आणि शिक्षक यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना ॲड. राजन दीक्षित यांनी अनंत विचार परिवाराचे आभार मानले. सामाजिक कार्याची दखल घेऊन केलेला हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती तसेच साप्ताहिक अनंत विचार परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages