ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर





करमाळा, (कटूसत्य वृत्त):- भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या ६३व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा एकलव्य प्रतिष्ठान व एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, युवा एकलव्य प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन दुपारी १२ वाजता होणार असून या कार्यक्रमास करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई संजय सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नगरसेवक मा. संजय (अण्णा) सावंत, सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. गणेश करे पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रैणिक खाटेर, YCM चे प्राचार्य प्रा. अभिमन्यू माने, ज्येष्ठ पत्रकार आशपाक सय्यद, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नगरसेवक रवी जाधव, नगरसेविका पूजाताई इंदलकर आणि नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे रक्तदान शिबिर एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, क्रांतिसंग्रामनगर, करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा हा उपक्रम केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक, युवक तसेच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक ॲड. संग्रामदादा रामकृष्ण माने यांनी केले आहे.
“रक्तदान करा, जीवनदान द्या!” या संदेशातून शिबिराच्या माध्यमातून सामाजिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages