शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश- गणेश काशीद
माढा (कटूसत्य वृत्त):- आजचे युग जरी सोशल मीडियाचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे असले तरी प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन हे शिक्षण प्रक्रियेत प्रभावी आणि परिणामकारक ठरते.याचाच प्रत्यय अंजनगाव उमाटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शासकीय गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून आला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अचूक व योग्य मार्गदर्शन करून त्यांचा भरपूर सराव करून घेतल्याने शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने पात्र ठरले आहेत.ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माढेश्वरी अर्बन बँकेचे माजी संचालक गणेश काशीद यांनी केले.
ते अंजनगाव उमाटे ता.माढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 5 वी व 7 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र ठरलेल्या 19 विद्यार्थ्यांचा सत्कार करताना बोलत होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक रोहिदास कापसे यांनी शाळेतील विविध उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या बाबींची माहिती सांगितली.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 19 विद्यार्थ्यांचा सत्कार माजी सरपंच गणेश काशीद व मुख्याध्यापक रोहिदास कापसे यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत 4 थी मध्ये मनस्वी कौलगे,स्वरा गुंड, आयेशा पटेल,प्रज्ज्वल उमाटे,स्वराली उमाटे,राणा काशीद,वैष्णवी सावंत,अथर्व उमाटे,अथर्व मुुळे,समर्थ माळी,विनायक कांबळे, सिमरन सय्यद तर 7 वीत वैभवी भोंग,कौस्तुभ दावणे, प्रणिती गायकवाड,प्रथमेश माळी,जोया पटेल,जिकरा पठाण,केशव गायकवाड असे एकूण 19 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
यावेळी मुख्याध्यापक रोहिदास कापसे,शीतल सुरवसे,मोनिका ओहोळ, रोहिणी लहाने,गंगा बुरंगे, नफिसा शेख,रूपाली शेटे, रणजित शेळके,मीनाक्षी भांगे,संतोष राऊत,तानाजी ननवरे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन करून आभार संतोषकुमार राऊत यांनी मानले.
.png)
No comments:
Post a Comment