उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून ८१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 1, 2026

उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून ८१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम

 उजनी धरणाच्या सोळा दरवाजातून ८१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक कायम वाढत असल्याने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 16 दरवाजातून ८१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. शुक्रवार (दि. ३१ जुलै) सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणाच्या सांडव्यावरून ८०,००० क्युसेक्स तर वीजनिर्मिती केंद्रातून १,६०० क्युसेक्स असा एकूण विसर्ग सुरू होता. त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सायंकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार उजनी धरणाची पाणीपातळी ४९६.७६० मीटर असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा १,४९३.७५ दशलक्ष घनमीटर (५२.७५ टीएमसी) इतका आहे. हा साठा धरणाच्या एकूण उपयुक्त क्षमतेच्या ९८.४६ टक्के आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ३,२९६.५६ दशलक्ष घनमीटर (११६.४० टीएमसी) असून जलसाठा क्षेत्र ३३४.४० चौ.कि.मी. इतके आहे.
दौंड नदी मोजणी केंद्रावरून उजनी धरणात ३२,१०७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
याशिवाय मुख्य कालव्यातून २,७०० क्युसेक्स, बोगद्यातून ९०० क्युसेक्स, सिना-माढा उपसा सिंचन योजनेस २८० क्युसेक्स आणि दहीगाव उपसा सिंचन योजनेस ९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
चौकट
कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. परिस्थितीनुसार धरणातून होणाऱ्या विसर्गात आवश्यकतेनुसार आणखी वाढ केली जाऊ शकते.
प्रशासनाने भीमा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे, पंप, पाइप, शेतीची अवजारे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
उजनी धरणाकडे येणाऱ्या प्रमुख धरणांची आज सायंकाळी सहा पर्यंत ची स्थिती

धरणाचे नाव| भरले (%)| विसर्ग (क्युसेक्स)
येडगाव| 95.28% विसर्ग 1,000
वडज| 81.55%| विसर्ग4,000
डिंभे| 91.06%|विसर्ग 8,500
घोड| 96.36%| विसर्ग15,000
चिल्हेवाडी| 78.50%|विसर्ग 1,126
कळमोडी| 100.00%| विसर्ग3,674
चासकमान| 100.00%| विसर्ग19,680
भामा आसखेड| 99.22%|निसर्ग 9,900
वडीवळे| 97.86%|विसर्ग 3,592
आंद्रा| 100.00%| विसर्ग 1,353
पवना| 99.72%|विसर्ग 8,400
कासारसाई| 98.51%| निसर्ग 1,800
मुळशी| 87.62%| निसर्ग 8,800
वरसगाव| 97.31%|विसर्ग  5,200
पानशेत| 98.68%| निसर्ग 18,115
खडकवासला| 100.00%|विसर्ग  43,571
गुंजवणी| 91.16%| विसर्ग 2,711 वरील तक्ता भीमा खोरे अहवालातील धरणांच्या नोंदींवर आधारित पाटबंधर खात्याने दिलेली माहिती आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages