५० टक्के सवलतीत १ हजार शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

५० टक्के सवलतीत १ हजार शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम

५० टक्के सवलतीत १ हजार शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम 
  महिला सक्षमीकरणासाठी शिवसेनेचा उपक्रम



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना ओबीसी विभाग जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या वतीने ५० टक्के सवलतीच्या दरात १ हजार शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवसेना महिला ओबीसी जिल्हाप्रमुख उमा अकोलकर (माळी) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी २६ जून २०२६ रोजी मार्डी येथील पेठेतील मारुती मंदिर परिसरात या उपक्रमाचा पहिला टप्पा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार ज्योतीताई वाघमारे, शिवसेना नेते रमेश बारसकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख (महिला आघाडी) उमा नागेश अकोलेकर-माळी यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यात एक हजार शिवणयंत्रांच्या नियोजनापैकी ५०० शिलाई मशीनचे ५० टक्के सवलतीच्या दरात पात्र महिलांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ५०० शिलाई मशीनचे वाटप मार्डी, राजमसले व पंचक्रोशीतील पात्र महिलांना करण्यात येणार आहे. या माध्यमातून अधिकाधिक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले की, महिलांना केवळ शिलाई मशीन उपलब्ध करून देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, त्यांना स्वावलंबी बनविणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
         या पत्रकार परिषदेस ज्योत्स्ना भाले, नंदकुमार गरड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages