श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमेनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन
१९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- १९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक,पर्यावरणका रक, क्रीडाविषयक कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (प.ट्र.नं.एफ-२२७९), अक्कलकोट हे धर्मादाय न्यास संस्थापक अध्यक्ष सन्मा. श्री जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व न्यासाचे सन्मा. कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. १९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे काका यांनी पत्रकारांना दिली आहे.*
दि. १९ जुलै रोजी रविवार सायंकाळी ६.३० मिनीटानी कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, अक्कलकोट विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, प.पू.श्री मोहन पुजारी – मुख्य पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, वे.शा.सं.श्री अण्णू महाराज –पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, तहसिलदार विनायक मगर, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचे प्रतिमाचे पूजन, दिप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
*गुरुपौर्णिमा दिन – दि. २९ जुलै*
दि. २९ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त बुधवार सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे. यांच्या हस्ते- केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्य मंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहळ, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सी.ए. महेश गावस्कर, पुणे, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, सचिन सांबरेकर पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी, ललिताताई वीर आगासखिंड नाशिक देणगीदार, यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
महानैवेद्य व आरतीनंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी उदघाटन प्रमुख उपस्थिती चंद्रकांत पंडित, मा.भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक व समीर दिघे मा.भारतीय क्रिकेटपटू हे असणार आहेत. सदरचा उदघाटन सोहळा हा गट नं. ५८१, नवीन वाहनतळ, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे होणार आहे.
*एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर* *:*
नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होत आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे. सध्या गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे, येत्या २ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे.
*पादुका पालखी व भव्य मिरवणूक -*
दि. २९ जुलै रोजी बुधवार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि ‘नांदब्रम्ह’ पुणे व “आराध्या” चुनाभट्टी, मुंबई या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ आमदार शेखर निकम, चिपळूण, भरत मित्र मंडळ पुणे अध्यक्ष व न्यासाचे क्रियाशील सभासद बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, अॅड. नितीन हबीब- कायदेशीर सल्लगार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व जेष्ठ विधिज्ञ, सो.म.पा. नगरसेवक, मा.स्थायी समितीचे माजी चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, सोलापूर, चुनाभट्टी मुंबईचे माजी नगरसेवक विजुभाऊ तांडेल, देणगीदार संतोष नाईक, सायन मुंबई यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
न्यासाकडून अग्निशामक व रुग्णवाहिका आणि पिण्याच्या पाण्याकरिता गळोरगी येथून पाणी पुरवठा, एस.टी. महामंडळाच्या चालक व वाहकाकरिता विश्रांती गृह याची देखील सोय केलेली आहे. न्यासाकडून राजे फत्तेसिंह क्रीडांगण वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन व सुशोभीकरण, मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल नुतनीकरण करण्यात आले आहे. याबरोबरच तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत
• पाणी आडवा -पाणी जिरवा -पाण्याचा अपव्यय टाळा.
• पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन करा.
• स्वच्छता अभियान राबवू भारत -महाराष्ट्र अक्कलकोट स्वच्छ करू.
• बेटी बचाओ-बेटी पढावो.
• पाणी हे जीवन आहे.
• स्त्रीभ्रुण हत्या टाळा.
• आपला अन्नछत्र -स्वच्छ अन्नछत्र हा संदेशामुळे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. न्यासाला देणगीदारास आयकरात ८० - जी कलमान्वे सवलत आहे.
• वसुंधरेची जपणूक.
• प्लास्टिक वापराव बंदी.
*कुस्तीगरांसाठी दर महा खुराकाचे कीट वाटप :*
तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ७५ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी या जीनंसांचा समावेश आहे.
*यंदा श्रींच्या पालखीला लालबाग राजा च्या बँन्ड ची सलामी-*
यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने, शी स्वामी समर्थ महाराजांना अखंड गरज आणि भक्तीभावाच्या अविस्मरणीय वातावरणात राज वैभवी, निघणाऱ्या श्रींच्या पालखीला लालबागचा राजा, लालबाग मुंबई येथील ख्यातनाम स्वरांजली बँन्ड पथकाच्या सलामीने मार्गस्थ होणार आहे. सदरचे बँन्ड हे दरवर्षी लालबाग राजाच्या गणेश उत्सवाच्या काळात प्रतिष्ठापणा पासून ते विसर्जन पर्यंत श्रींच्या सेवेत असतो, यंदाच्या गुरुपौर्णिमेला विशेष आमंत्रित बँन्ड पाथक हे अन्नछत्र मंडळाच्या पालखी व रथोत्सवाच्या सेवेत असणार आहे.
सदरील कार्यक्रम हे ठरलेल्या दिवशी व वेळेवर स्वामी कृपेने संपन्न होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी या विविध कार्यक्रमास उपस्थित राहून श्री स्वामी दर्शनाचा व स्वामी सेवेचा लाभ घेऊन कृतार्थ व्हावे, असे आवाहन न्यासाकडून करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment