शेतकरी, डॉक्टर आणि सीए हे समाज विकासाचे खरे शिल्पकार : नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : शेतकरी अन्नसुरक्षेचा आधार आहेत, डॉक्टर समाजाला निरोगी ठेवण्याचे कार्य करतात, तर चार्टर्ड अकाउंटंट आर्थिक शिस्त आणि विकासाला दिशा देतात. या तिन्ही घटकांचे राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटतर्फे फार्मर्स डे, डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी डॉ. मंजुनाथ पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. संतोष मोटे, सीए चंद्रकांत रच्चा, श्रेणीक शहा, सीए ओंकारेश्वर उटगे तसेच प्रगतिशील शेतकरी चन्नबसप्पा जोकारी आणि प्रमोद पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करून त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे, राजेंद्र हत्ते, राजशेखर कापसे, शिरीष पंडित, शिवशरण खुबा, विठ्ठल तेली, मल्लिनाथ साखरे, प्रभाकर मजगे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment