आषाढी वारीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा- चेतनसिंह केदार सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

आषाढी वारीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा- चेतनसिंह केदार सावंत

 आषाढी वारीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज; नियोजनाचा आढावा- चेतनसिंह केदार सावंत




कासेगाव (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार, तत्पर व अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज. या अनुषंगाने कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नियोजन व आढावा बैठक पार पडली.

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किट, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता आणि प्रत्येक पालखी सोबत ALS रुग्ण वाहिका देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली. वारकऱ्यांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचा महत्त्वपूर्ण सोहळा असून, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. आषाढी वारीदरम्यान कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण उद्भवू नये, यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही यावेळी सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.

याबैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री. सतीश कोपुरवाड  तसेच या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. 

चौकट : 

वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज
“आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाप्रती असलेली आपली सेवा आहे. प्रत्येक वारकऱ्याला वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने व तत्परतेने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages