माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा- मल्लिनाथ कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात शेती, सिंचन, उद्योग, शिक्षण, ग्रामीण विकास रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली. असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले. शेतीचे आधुनिकिकरण करण्यासाठी सुधारित बियाणे, सिंचन सुविधा, खतांचा वापर आणि कृषी संशोधनाला त्यांनी चालना दिली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना राबविल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.
त्यांच्या काळात औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळाली. नवीन उद्योग उभारणे,शिक्षणाचा प्रसार, सामाजिक न्याय आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठीही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले आभार कार्यक्रम अधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी मानले कार्यक्रमास प्राध्यापिका हर्षदा गायकवाड, जनाबाई चौधरी, शितल फुटाणे उपस्थित होते.
चौकटीत
कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून किणी गावातील शेतकरी दयानंद घिवारे, विजयकुमार घिवारे व उल्हास घिवारे यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
.jpg)
No comments:
Post a Comment