टीईटी विरोधात लढा तीव्र करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

टीईटी विरोधात लढा तीव्र करणार

 टीईटी विरोधात लढा तीव्र करणार

टीईटी संघर्ष समन्वय समितीचा निर्धार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाच्या टीईटी सक्तीच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार काल झालेल्या टी ई टी संघर्ष समन्वय समितीच्या मेळाव्यात झाल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी दिली.
 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेतील सर्वच कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरटीई अॅक्ट महाराष्ट्र राज्यामध्ये 2013 पासून लागू करण्यात आला आहे.पण 2013 पूर्वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यामध्ये टीईटी संघर्ष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या वतीने काल समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर कृष्णा हिरेमठ, कल्लप्पा फुलारी,प्रकाश कोळी, मुरलीधर कडलासकर, नितीन रुपनर, विनोद आगलावे,अब्दुल गफूर अरब, सोमेश्वर याबाजी, दत्तात्रय चौगुले, अजिंक्य पाटील, आदी उपस्थित होते 
  टीईटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यातील खासदारांना भेटून त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हा प्रश्न संसदेत मांडण्याबाबत त्यांना विनंती करण्यात येणार आहे.आर. टी. ई.च्या अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करण्याबाबत त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. इतर राज्याने ज्याप्रमाणे परीक्षेची काठीण्य पातळी कमी केली आणि गुणांची सवलत दिलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात यावा या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याचे नेते सुरेश पवार यांनी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.

 समन्वय समितीमध्ये सहभागी असलेल्या संघटना-
 
 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना, संभाजी आरमार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

  मेळावा यशस्वी करण्यासाठी आप्पाराव इटेकर, संतोष माशाळे, दीपक डांगे,देवदत्त मिटकरी, गोपीचंद राठोड बिभीषण शिरसाट,रमेश बेडगे, विश्वजीत माणिक शेट्टी,जयंत गायकवाड यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक मुरलीधर कडलासकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages