श्री गजानन‎ महाराजांच्या‎ पालखीचे 'ईच्छा भगवंताची‎ परिवारा'कडून भव्य स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

श्री गजानन‎ महाराजांच्या‎ पालखीचे 'ईच्छा भगवंताची‎ परिवारा'कडून भव्य स्वागत

 श्री गजानन‎ महाराजांच्या‎ पालखीचे 'ईच्छा भगवंताची‎ परिवारा'कडून भव्य स्वागत




सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):‎- आषाढी‎ वारीच्या‎ पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगावचा‎ राणा, संतश्रेष्ठ श्री गजानन‎ महाराजांच्या‎ पालखीचे इतिहासात प्रथमच रामवाडी परिसरात‎ आगमन झाल्याने संपूर्ण‎ परिसर‎ भक्ती, श्रद्धा आणि‎ हरिनामाच्या गजराने‎ दुमदुमून‎ गेला. रेल्वे पुलाच्या‎ कामामुळे‎ यंदा पालखीचा मार्ग बदलल्याने प्रथमच‎ रामवाडीतील‎ वारकरी‎ भक्तांना‎ महाराजांच्या पालखीचे दर्शन‎ घेण्याचा‎ योग‎ लाभला.‎ टाळ-मृदुंगाचा‎ निनाद,‎ "गण गण‎ गणात‎ बोते"चा जयघोष‎ आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात‎ भाविकांनी‎ महाराजांच्या पालखीचे‎ दर्शन‎ घेत भक्तिसागरात तल्लीन होत आध्यात्मिक आनंद अनुभवला ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने गुलाब पुष्पांची भव्य पुष्पवृष्टी करून पालखीचे‎ स्वागत‎ करण्यात‎ आले.‎ तसेच‎ महाराष्ट्राचे‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ यांच्या‎ वाढदिवसाचे‎ औचित्य साधून वारकरी‎ संप्रदायातील भाविकांना राजगिरा‎ लाडू प्रसादाचे‎ वाटप करण्यात‎ आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी‎ देवकर,‎ ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराचे‎ आधारस्तंभ‎ लक्ष्मण मामा‎ जाधव,‎ श्री‎ सद्गुरू बसवारुढ‎ मठाचे‎ मठाधिपती श्री‎ शिवपुत्र आप्पाजी, भाजपा शहराध्यक्ष‎ रोहिणी‎ तडवळकर,‎ स्थायी‎ समिती‎ सभापती‎ रंजिता चाकोते, नगरसेविका‎ चैत्रालीताई गायकवाड,‎ सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे‎ पोलीस‎ निरीक्षक श्रीशैल गजा,‎ श्रीमती लक्ष्मी‎ दत्तात्रय‎ नडगिरी,‎ महापालिकेच्या आरोग्य अधिकारी‎ डॉ. राखी माने, सामाजिक कार्यकर्ते शिवराज‎ गायकवाड‎ आदी‎ मान्यवर‎ उपस्थित‎ होते.‎ उपस्थितांचे स्वागत भाजपा‎ नगरसेवक किसन जाधव‎ यांनी‎ केले यावेळी श्री शिवपुत्र आप्पाजी यांनी‎ नामस्मरण, सेवाभाव आणि‎ संत‎ परंपरेचे‎ महत्त्व‎ अधोरेखित‎ करत,‎ संतांच्या चरणस्पर्शाने भूमी‎ पावन होते आणि‎ समाजात‎ प्रेम,‎ समता‎ व‎ भक्तीची भावना‎ दृढ‎ होते,‎ असे सांगितले. उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी‎ देवकर,‎ भाजपा‎ शहराध्यक्ष रोहिणी‎ तडवळकर व‎ स्थायी‎ समिती‎ सभापती‎ रंजिता‎ चाकोते यांनी‎ सामूहिक मनोगतात,‎ इतिहासात प्रथमच‎ श्री‎ गजानन महाराजांची पालखी रामवाडीत आल्याने‎ संपूर्ण‎ परिसर धन्य झाला असून‎ वारकरी संप्रदायाची सेवा,‎ समता आणि भक्तीची परंपरा‎ अधिक‎ बळकट‎ होईल. महाराजांच्या‎ कृपेने‎ सर्वांच्या‎ जीवनात‎ सुख, समाधान व आध्यात्मिक उन्नती‎ लाभो,‎ अशी प्रार्थना‎ व्यक्त‎ केली.‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे‎ मार्गदर्शक तथा‎ नगरसेवक किसन जाधव म्हणाले, श्री गजानन महाराजांच्या‎ दिंडीच्या‎ इतिहासात‎ प्रथमच‎ पालखी‎ रामवाडीत‎ आली, हा‎ आमच्यासाठी‎ भाग्याचा क्षण आहे. महाराजांच्या‎ आगमनाने संपूर्ण परिसरात‎ नवचैतन्य‎ आणि भक्तिमय वातावरण निर्माण‎ झाले‎ असून ही‎ सेवा‎ पुढेही‎ अखंड‎ सुरू‎ राहील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ राजू ब्रदर जाधव, अजिंक्य जाधव, कार्तिक‎ जाधव, तेजस‎ गायकवाड, उत्कर्ष‎ गायकवाड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज‎ पठाण,‎ महादेव राठोड, श्रीकांत‎ गिड्डे,‎ यल्लाप्पा शिवपुरे,‎ हुलगप्पा शासम,‎ उत्तम‎ देडे,‎ गोपाळ जाधव,‎ पवन बेरे,‎ किरण सगटे,‎ विकी‎ सगटे‎ यांच्यासह ईच्छा‎ भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम‎ घेतले. मोठ्या भक्तिमय, मंगलमय‎ आणि हरिनामाच्या‎ गजरात पालखी सोहळा‎ संपन्न‎ झाला.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages