अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

 अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून एम. बी. गायकवाड यांची न्यायालयाकडून  निर्दोष मुक्तता




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बेकायदेशीर व विनापरवाना सावकारी केल्याचा खोटा आरोप सोलापूर येथील व्यावसायिक एम. बी. गायकवाड (रा. न्यु पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्यावर ठेवण्यात आला होता. या खटल्याचा निकाल नुकताच घोषित झाला असून, न्यायालयाने एम. बी. गायकवाड यांची निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:

ऑगस्ट २०१६ मध्ये सहनिबंधक कार्यालयाच्या पथकाने व जेलरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महेश गायकवाड यांच्या घरावर धाड टाकून काही कोरे बॉण्ड, धनादेश व वह्या जप्त केल्याचा दावा केला होता.
या आधारे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून (गु.र.नं. ३२४/२०१६) महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

 न्यायालयाचे निरीक्षण व निष्कर्ष:

सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. १०) यांच्या न्यायालयात (नि.फौ.ख.क्र. ७३/२०१७) या प्रकरणाची सुनावणी झाली.
 बचाव पक्षातर्फे ॲड श्रीनीवास कटकुर यांचेवतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या उलटतपासणीवरून न्यायालयाने खालील महत्त्वाच्या बाबी नोंदवल्या:

 साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती:

 सरकारी पक्षाच्या मुख्य फिर्यादी, पंच आणि तपासी अंमलदार यांच्या जबाबात व धाडीच्या तारखांमध्ये मोठी विसंगती आढळून आली.

 कायदेशीर त्रुटी:
ज्या घरावर धाड टाकली, ते घर आरोपीच्याच मालकीचे होते हे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही. तसेच घरझडतीचे अधिकृत आदेश अभिलेखावर आणले गेले नाहीत.
 
पुराव्याचा अभाव:
 जप्त केलेले धनादेश आणि बॉण्ड्स खरोखर अवैध सावकारीसाठी वापरले जात होते हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला. मूळ तक्रारदाराच्या नावाचा कोणताही धनादेश किंवा बॉण्ड आरोपीकडे सापडला नाही.

सरकारी पक्ष आरोपीविरोधातील गुन्हा संशयातीतपणे सिद्ध करू शकला नसल्याने न्यायालयाने एम. बी. गायकवाड यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (१) अन्वये त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

सदर खटल्यात आरोपी एम. बी. गायकवाड यांच्यातर्फे विधिज्ञ ॲड श्रीनिवास. कटकूर व ॲड आकाश आयंची यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages