जंतर-मंतर आंदोलनाला खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पाठिंबा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

जंतर-मंतर आंदोलनाला खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पाठिंबा

 जंतर-मंतर आंदोलनाला खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पाठिंबा




दिल्ली (वृत्त सेवा):- दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

शरद पवार आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधी अभिजीत दिपके यांच्यासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध शैक्षणिक प्रश्न व मागण्या त्यांनी जाणून घेतल्या.

यावेळी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे, त्यांच्या प्रश्नांवर तातडीने योग्य तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या शांततापूर्ण मार्गाने मांडण्याचा अधिकार असून, त्यांच्या भावना आणि प्रश्नांची दखल घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages