स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त 351 शाळा-महाविद्यालयांना प्रतिमा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त 351 शाळा-महाविद्यालयांना प्रतिमा भेट

स्व.अजितदादा पवार जयंतीनिमित्त 351 शाळा-महाविद्यालयांना प्रतिमा भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूरात उपक्रम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाच्या आदेशानुसार दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांना स्व. अजितदादा पवार यांच्या जवळपास 351 प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या आदेशान्वये तसेच प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात तसेच जेष्ठ नेते तौफिक भाई शेख माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे अजित बनसोडे हेमंत चौधरी अनिल उकरंडे याच्या शुभहस्ते  हा उपक्रम पार पडला.
 मंगळवारी पार्क चौक येथील शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या संपर्क कार्यालयातून विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमा उपलब्ध करून भेट स्वरूपात देण्यात आल्या.

यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,जेष्ठ नेते तौफिक भाई शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, अनिल उकरंडे,अजित बनसोडे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रतिभा कांबळे, पूजा कांबळे, श्यामराव गांगर्डे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, महेश कुलकर्णी, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम जाधव, सोशल मीडिया विभाग अध्यक्ष वैभव गंगणे आणि कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,नाम पवार असिफ शेखराजे, अभि सय्यद, 
यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध शाळांतील शिक्षक व प्रतिनिधींनी स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली. शासनाच्या निर्णयानुसार स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages