ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे 'जिज्ञासा आषाढी वारी' उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे 'जिज्ञासा आषाढी वारी' उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजतर्फे 'जिज्ञासा आषाढी वारी' उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद



अकलूज (कटूसत्य वृत्त):- जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन पालखी सोहळ्याचे अकलूज नगरीत आगमन झाल्यानंतर वारीच्या वाटेवर अखंड चालणाऱ्या वारकरी भक्तांच्या सेवेसाठी आयोजित 'जिज्ञासा आषाढी वारी' आरोग्य सेवा उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर (अकलूज) यांच्या मार्गदर्शनाखाली जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकलूज यांच्या वतीने गांधी चौकातील 'पद्मशिव हॉस्पिटल अँड एंडोस्कोपी सेंटर' जवळ या भव्य शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 
               या उपक्रमाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या उत्साही 'सराटी-अकलूज विद्यार्थी दिंडी'ने झाला.यानंतर दिवसभर चाललेल्या आरोग्य सेवा उपक्रमात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर,प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून वारकऱ्यांची वैद्यकीय शुश्रूषा केली.​या आरोग्य सेवा शिबीरामध्ये दिवसभरात एकूण ५८३ वारकरी बांधवांची प्रत्यक्ष मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर ४२८ वारकऱ्यांची रक्तदाब (BP) आणि रक्तशर्करा (Sugar) तपासणी करण्यात आली.पायी प्रवास करणाऱ्या वारकरी बांधवांच्या पायांचे स्नायू दुखणे व शारीरिक थकवा दूर करण्यासाठी 'स्नेहन व स्वेदन' या विशेष आयुर्वेदिक उपचार पद्धतीने तब्बल ७५९ वारकऱ्यांची मोफत 'चरणसेवा' करण्यात आली. याशिवाय किरकोळ दुखापती झालेल्या ७ वारकऱ्यांना तातडीने प्रथमोपचार देऊन सर्व गरजू रुग्णांना आवश्यक त्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
            ​हा स्तुत्य उपक्रम संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील,माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील,सौ. सत्यप्रभादेवी रणजीतसिंह मोहिते पाटील,खासदार व सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील,विश्वस्त संजयजी राकले,कॉलेजचे चेअरमन विश्वतेजसिंह मोहिते पाटील आणि सौ.शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने पार पडला.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे डीन व प्रिन्सिपल डॉ. प्रशांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली,हॉस्पिटल स्टाफ तसेच कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे पार पडले.वारीच्या वाटेवर साक्षात विठ्ठलरूपी वारकऱ्यांची सेवा करण्याची सुवर्णसंधी लाभल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages