स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त मोफत विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिराचे आयोजन. डॉ. सुधीर शिनगारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 29, 2026

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त मोफत विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिराचे आयोजन. डॉ. सुधीर शिनगारे

 स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त मोफत विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिराचे आयोजन. डॉ. सुधीर शिनगारे



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष व वसंतदादा काळे मेडिकल फाउंडेशन संचलितजनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर यांच्या वतीने स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त मोफत विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आषाढी यात्रा कालावधीत पायी चालत येणाऱ्या भाविकभक्तांची मोफत आरोग्य तपासणी प्रभावीपणे राबवली.

या आरोग्य शिबिराची सुरुवात दि.२२ जुलै रोजी आषाढी यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या वारकरी भाविकभक्तांची मोफत आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करून त्यांना गोळ्यांचे वितरण करण्यात आले. हे शिबीर दि.२२ व २३ जुलै या कालावधीत मौजे भंडीशेगाव येथे राबवून भाविकांना मोफत औषध उपचार करण्यात आले. दि.२५,२६ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरात विविध भागात पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत विश्वविक्रमी महा आरोग्य शिबीर प्रबाविपणे राबवून सुमारे 2700 रुग्णांनी आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आले. या वेळी वारकरी भक्तांनी वेळेत औषध उपचार केल्या बद्दल समाधान व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधिर शिनगारे, स.शि.वसंतराव काळे स.का.चे संचालक राजाभाऊ माने, पळशी चे माजी सरपंच अर्जुन जाधव,व नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या विद्या कुचेकर डॉ.पद्मराजे माने, डॉ भूषण म्हेत्रे, डॉ गणेश चव्हाण,अक्षय कुचेकर, राजेश पाटील, वाघमारे, लबटकर, राजेंद्र साळुंखे, तसेच जनकल्याण हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स, स्टाफ व वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन संचलितमुक्ताई कॉलेज ऑफ नर्सिंग एज्युकेशनजनकल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन तसेच शिवस्वराज्य मेडिकल फाऊंडेशन संचलित राष्ट्रमाता जिजाऊ नर्सिंग कॉलेजशिवकमल कॉलेज ऑफ अक्यूपंक्चर सायन्सेस यांचेवतीने आषाढी यात्रेतील भाविकांची चरण सेवा करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून मनोभावे वारकऱ्यांची सेवा केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages