ऑर्किडच्या दिंडीत विठुरायाच्या गजरात साक्षरतेचा जागर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

ऑर्किडच्या दिंडीत विठुरायाच्या गजरात साक्षरतेचा जागर

 ऑर्किडच्या दिंडीत विठुरायाच्या गजरात साक्षरतेचा जागर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे विश्वस्त तथा युवा उद्योजक यशराजव करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची आरती व पालखी पुजन करण्यात आले. यावेळी ज्यु.कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी, मार्गदर्शिका मीना पारखे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी व संस्थेच्या सचिवा सौ.वर्षाताई विभुते यांनी आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या नामस्मरण गितावर नृत्य सादर करून विठ्ठलाचा जयघोष केला. यानंतर शाळेच्या आवारातुन दिंडीचे प्रस्थान होऊन ती जुनी मिल मार्गे वीजवितरण कार्यालय येथील महादेव मंदिरास प्रदक्षणा घालुन शाळेच्या मैदानावर येऊन अश्वाच्या सोबतीने विद्यार्थी व शिक्षकांनी रिंगण सोहळा पार पाडला.
या बालदिंडीत नर्सरीच्या बालचमुंनी विविध संताची वेशभूषा साकारुन दिंडीची शोभा वाढविली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती चाटी यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages