विशाल पांढरे यांची पुणे सायबर क्राईम येथे वैज्ञानिक अधिकारी पदावर नियुक्तीबद्दल सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 13, 2026

विशाल पांढरे यांची पुणे सायबर क्राईम येथे वैज्ञानिक अधिकारी पदावर नियुक्तीबद्दल सत्कार

 विशाल पांढरे यांची पुणे सायबर क्राईम येथे वैज्ञानिक अधिकारी पदावर नियुक्तीबद्दल सत्कार




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी (वेळापूर) येथील गावचे सुपुत्र विशाल सावळा पांढरे यांची पुणे विभागीय सायबर क्राईम / फोरेन्सिक विभाग (गृह विभाग, महाराष्ट्र शासन) येथे वैज्ञानिक अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.विशाल हे पिसेवाडी येथील सामाजिक सामाजिक कार्यकर्त्या रंजना सावळा पांढरे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.यापूर्वी ते मुंबई येथील मुख्य कार्यालयात कार्यरत होते.  कॉम्प्युटर सायन्स आणि सायबर लॉचे (शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई) येथे शिक्षण घेतलेल्या विशाल पांढरे यांना सायबर क्राईम क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव आहे. त्यांनी २०१६ ते २०२१ या काळात नवी दिल्लीच्या विधी विज्ञान प्रयोगशाळेत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यादरम्यान त्यांनी सीबीआय, एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या अनेक क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात सायबर तज्ज्ञ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एमपीएससीच्या माध्यमातून २०२१ मध्ये त्यांची महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागात नियुक्ती झाली. त्यांनी अधिकाऱ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages