शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका पुर्ववत ठेवण्याची मागणी* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 3, 2026

शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका पुर्ववत ठेवण्याची मागणी*

 शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका पुर्ववत ठेवण्याची मागणी 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र शासनाने यावर्षी प्राथमिक शाळेतील शारिरीक शिक्षण विषयाच्या तासिका कमी केल्याने क्रीडा शिक्षकांवर व विशेषतः खेळाडूवर वर्कलोड बाबत अन्याय होणार आहे म्हणून शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका पुर्ववत ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. क्रीडा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सोलापूर महानगर पालिका प्रशासनाधिकारी मल्हारी माने  यांची भेट घेऊन शारीरिक शिक्षणाच्या तासिका कमी न करण्या बाबत निवेदन देण्यात आले.प्रशासन अधिकार्‍यांनी दि. २३ जून रोजी परिपत्रकाद्वारे  इयत्ता पहिली   ते आठवीच्या वर्गाच्या शारीरिक शिक्षणाचे दोन तास कमी करुन ते मुल्य संवर्धन विषयाला देण्यात यावी असे आदेश सर्व शाळाना दिले होते. या आदेशामुळे शारीरिक शिक्षणाचा ५०% वर्कलोड कमी होणार आहे. तसे झाले तर अनेक क्रीडा शिक्षकांच्या कार्यभारावर परिणाम होणार होणार आहे.  आज  प्रशासन अधिकार्‍ यांसोबत सकारात्मक चर्चा झाली .सदर पत्रक रद्द करण्याचे आश्वासन दिल्यामुळे या संदर्भात होणारे अंदोलन स्थगीत करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव , शहर अध्यक्ष विठ्ठल कुंभार, संतोष जाधव, प्रा. राहुल हजारे, प्रा. प्रमोद संगे, प्रा. सागर गायकवाड , डॉ. उज्वल मलजी, संजय पंडित, प्रसन्न काटकर, शितल शिंदे, पप्पू मैत्री आदी क्रीडा शिक्षकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages