नाझिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मुस्लिम समाजाचे करमाळा प्रशासनाला निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 3, 2026

नाझिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मुस्लिम समाजाचे करमाळा प्रशासनाला निवेदन

नाझिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मुस्लिम समाजाचे करमाळा प्रशासनाला निवेदन


 करमाळा  (कटूसत्य वृत्त):- सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, मुस्लिम समाज तसेच धार्मिक व्यक्तींविषयी आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केल्याचा आरोप करत नाझिया इलाही खान यांच्याविरोधात करमाळ्यातील मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

मक्का मशीद ट्रस्ट, करमाळा यांच्या लेटरहेडवर देण्यात आलेल्या या निवेदनात, दिनांक १ मे २०२६ पासून आजपर्यंत नाझिया इलाही खान या सोशल मीडियावर सातत्याने व्हिडिओ प्रसारित करत असून, त्या व्हिडिओंमधून मुस्लिम धर्म, मुस्लिम समाज, मोहम्मद पैगंबर, त्यांच्या पत्नी तसेच वैयक्तिक जीवनाबाबत कथित आक्षेपार्ह, काल्पनिक आणि असत्य स्वरूपाची विधाने करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून, समाजात असंतोष निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवू शकतो, अशी भीती निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे नाझिया इलाही खान यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरोधात योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा आणि त्याची प्रत निवेदनकर्त्यांना द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages