ईच्छा भगवंताची परिवाराच्या ‘भाऊ चषका’चा‎ दिमाखदार समारोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

ईच्छा भगवंताची परिवाराच्या ‘भाऊ चषका’चा‎ दिमाखदार समारोप

 ईच्छा भगवंताची परिवाराच्या ‘भाऊ चषका’चा‎ दिमाखदार समारोप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-‎ ईच्छा भगवंताची‎ बहुउद्देशीय सामाजिक संस्थांकडून‎ महाराष्ट्राचे‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस तसेच सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग क्र. २२ चे भाजपा‎ नगरसेवक किसन जाधव‎ यांच्या वाढदिवसाचे औचित्य‎ साधून विजापूर रोड येथील‎ शासकीय क्रीडांगणावर २२‎ ते‎ २५‎ जुलैदरम्यान‎ आयोजित‎ ‘भाऊ‎ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट‎ स्पर्धेचा‎ पारितोषिक वितरण‎ सोहळा‎ अक्कलकोटचे‎ आमदार‎ सचिन‎ कल्याणशेट्टी व शहर‎ मध्यचे‎ आमदार‎ देवेंद्र‎ कोठे यांच्या हस्ते‎ उत्साहात पार पडला.‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे आधारस्तंभ‎ लक्ष्मण‎ मामा जाधव यांच्या‎ नेतृत्वाखाली, माजी‎ नगरसेवक नागेश‎ अण्णा‎ गायकवाड यांच्या‎ मार्गदर्शनात‎ युवा‎ नेते‎ चेतन‎ नागेश‎ गायकवाड, कार्तिक‎ जाधव, अजिंक्य अनिल जाधव‎ आणि प्रेम‎ नागेश गायकवाड‎ यांनी स्पर्धेचे‎ अत्यंत‎ शिस्तबद्ध व‎ दर्जेदार‎ नियोजन केले. उपस्थित मान्यवरांचे‎ स्वागत कार्तिक जाधव‎ व‎ चेतन‎ जाधव यांनी केले.‎ यावेळी भाजपा शहराध्यक्षा‎ रोहिणीताई तडवळकर, नगरसेविका संगीताताई जाधव,‎ माजी महिला बालकल्याण समिती‎ सभापती अश्विनीताई‎ चव्हाण, चैत्रालीताई‎ गायकवाड,‎ कल्पनाताई‎ कदम,‎ नगरसेवक तथा‎ मंडई‎ व उद्यान‎ समिती‎ सभापती‎ राजशेखर‎ पाटील,‎ अक्षय अंजिखाने, माजी नगरसेवक‎ गुरुशांत धुत्तरगांवकर, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड,‎ अक्षय वाकसे,‎ टकारी‎ समाज युवक‎ अध्यक्ष विनोद गायकवाड, श्रीकांत गिड्डे,‎ यशवंत‎ पाथरुट, संगमेश्वर‎ बगले, राधिका‎ परब, दिपाली हटकर‎ आदी‎ मान्यवर उपस्थित‎ होते. स्पर्धेत‎ ग्रामीण‎ व शहरी भागातील‎ १६ संघांनी‎ सहभाग‎ घेतला. धावते समालोचक पवार आणि‎ डान्सिंग‎ अंपायर‎ म्हणून प्रसिद्ध‎ सोन्या बापू‎ भोसले‎ हे‎ स्पर्धेचे विशेष आकर्षण‎ ठरले.‎ अंतिम सामने‎ चुरशीचे झाले.‎ आमदार सचिन दादा‎ कल्याणशेट्टी‎ यांनी स्वतः मैदानात‎ बॅटिंग करत‎ खेळाडूंचे मनोबल‎ वाढविले.‎ यावेळी‎ आमदार‎ सचिन दादा‎ कल्याणशेट्टी‎ म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील‎ गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ‎ उपलब्ध‎ करून‎ देणारा हा उपक्रम‎ कौतुकास्पद असून अशा स्पर्धांमधून राज्याला दर्जेदार‎ क्रिकेटपटू‎ घडतील. तर‎ आमदार देवेंद्र कोठे म्हणाले,‎ क्रीडा‎ युवकांमध्ये शिस्त,‎ संघभावना‎ आणि‎ नेतृत्वगुण विकसित‎ करते. किसन भाऊ जाधव‎ व ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराने‎ राबविलेला‎ हा‎ उपक्रम प्रेरणादायी आहे‎ स्पर्धेत SP‎ 11 संघाने विजेतेपद पटकावले,‎ KK‎ राजहंस (उळे) उपविजेता ठरला,‎ तर KK‎ राजा‎ संघाने‎ तृतीय‎ क्रमांक मिळविला. विजयवीर‎ वडाळा‎ याला‎ मॅन‎ ऑफ द टूर्नामेंट व बेस्ट बॅट्समन, तर मजीद शेख यांना बेस्ट बॉलर पुरस्कार देण्यात‎ आला. प्रथम क्रमांकासाठी‎ ४६‎ हजार रुपये, द्वितीय‎ क्रमांकासाठी २३ हजार‎ रुपये आणि‎ तृतीय क्रमांकासाठी ११ हजार‎ रुपये‎ रोख‎ पारितोषिक व‎ चषक‎ मान्यवरांच्या‎ हस्ते‎ प्रदान करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages