राजेंद्र गुंड यांना जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा दैनिक पुण्यनगरीचे मानेगाव प्रतिनिधी राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दैनिक पुण्यनगरी समूहाच्या वतीने दिला जाणारा सन-2026 चा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.
आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबरोबरच फावल्या वेळेत मागील 10 वर्षांपासून पत्रकारितेचा छंद व आवड जोपासली आहे.त्यांनी परखड व निर्भिड लेखणीच्या माध्यमातून शेतकरी,गोरगरीब व सर्वसामान्य जनता तसेच शिक्षण,कृषी,सहकार,आरोग्य, बांधकाम क्षेत्राशी निगडित विविध सामाजिक प्रश्न व समस्या मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.त्यांच्या लेखणीची दखल घेऊन अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत.त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून दाखवलेले सातत्य, वस्तुनिष्ठता,सामाजिक बांधिलकी व अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज,गुणवंतांचा गौरव या गोष्टी खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत. याची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यावेळी खासदार ज्योती वाघमारे,दैनिक पुण्यनगरीचे संचालक प्रतीक शिंगोटे, सरव्यवस्थापक मंगेश कांचन, आवृत्तीप्रमुख व्यंकटेश पटवारी,वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर,जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, संस्थापक जनमेजयराजे राजे भोसले,जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर,मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,महापौर विनायक कोड्याल,उद्योगरत्न प्रणिता शिंदे,सरपंच संदीप पाटील, भाऊसाहेब पाटील,आर्या शिंदे,युवानेते कृष्णा शिंदे, विठ्ठलराव शिंदे प्राथमिक पतसंस्थेचे संचालक सुधीर गुंड,मेघना गुंड,डॉ.राजवर्धन गुंड,मेघश्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment