'दयानंद'च्या तीन विद्यार्थ्यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दयानंद महाविद्यालयातील एनसीसी छात्र शिवानंद सिद्धाराम तळवार याची महाराष्ट्र पोलीस दलात तर मोशीन चांद पटेल आणि निखिल नितिल सरवदे यांचा भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे.हे तिन्ही विद्यार्थी दयानंद महाविद्यालयाच्या एनसीसीचे छात्र असून एनसीसीमध्ये उत्तम कार्य केल्यामुळे त्यांना फायदा झाला व देश सेवा करण्याची संधी मिळाली.या विद्यार्थ्यांचे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना जिद्द, चिकाटी व सातत्याने प्रयत्न केल्याने निवड झाली आहे. निवडीबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉ. महेश चोप्रा,संस्थेचे प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे, प्राचार्य डॉ.बी.एच. दामजी,प्राचार्य डॉ. एस.बी. क्षिरसागर, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे व एनसीसी अधिकारी भीमाशंकर व्हनमाने आदीसह सर्व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment