Cjp च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोलापूरच्या माढ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ; वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद
-माढ्यातील शाळा ही केल्या बंद-
-पंतप्रधान मोदीच्या विरोधात घोषणाबाजी -धर्मेद्र प्रधानाच्या राजिनाम्याची मागणी-
माढा (कटूसत्य वृत्त):- दिल्लीतील Cjp च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ माढ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला माढ्यात प्रतिसाद मिळाला आहे.
माढा-मोडनिंब-कुर्डूवाडी-टेभुर् णी मधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून माढ्यातील काही शाळा ही बंद करण्यात आल्या.केद्रींय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजिनाम्याची मागणी करीत पोलिसांनी विद्यार्थ्यावर केलेल्या लाठीमार च्या घटनेचा निषेध नोंदवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन वंचित च्या कार्यकर्त्यानी शहरातून रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आंदोलकानी शहरातून बाजारपेठेतून रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.निळा झेंडा चौकात रॅली आल्यानंतर मोदी सरकार विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी केल्या.
यावेळी सुधीर लंकेश्वर,किरण पवार,गणेश मोरे,नवनाथ थोरात,आशपाक मोमीन,आकाश सरतापे,नितीन शिंदे
यांचेसह आंदोलक विद्यार्थी उपस्थित होते.
.jpg)

No comments:
Post a Comment