आरोग्य विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

आरोग्य विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

 आरोग्य विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  जयंती उत्साहात साजरी




नाशिक(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
       यावेळी विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.संजीव सोनवणे यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढयातील कार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ब्रिटीश काळात स्वदेशी वस्तुचा वापर वाढावा यासाठी त्यांनी मोठया प्रमाणात जनजागृती केली. वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजाला स्वराज्य लढयाची दिशा दिली. स्वराज्य मिळविण्यासाठी त्यांनी सुरु केलेले उपक्रम आजही सर्वांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
        या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.यावेळी श्री. महेंद्र कोठावदे, श्री. प्रकाश पाटील, ऑड. संदीप कुलकर्णी, श्री.यशवंत पाटील, श्री. नितीन शिंदे, श्री. संदीप ततार, श्रीमती सुवर्णा खैरनार, श्री. राजेश इस्ते, श्री. सचिन बोरसे, श्री. प्रशांत पवार, विजय सोनवणे, श्री. प्रल्हाद सेलमोकर,, श्री. नागेश थोरात, श्री. दिनेश चव्हाण, श्री. दिपक चव्हाण,  श्री. मनोज वाटाणे,   श्री. विजय कुरकुरे, श्री. श्रीमती वीणा इंगळे, श्रीमती पल्लवी उके, श्री. कुलदिप खांडेकर, सुरेश शिंदे, श्री. सचिन जोशी  आदी कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages