६४ व्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर; बार्शीच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींची लढाऊ भूमिका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

६४ व्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर; बार्शीच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींची लढाऊ भूमिका

६४ व्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर; बार्शीच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींची लढाऊ भूमिका

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मुंबई-पुण्यात सक्रिय सहभाग



बार्शी (कटूसत्य वृत्त): वयाच्या ६४ व्या वर्षीही शिक्षण घेण्याची जिद्द कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या बार्शीतील राजर्षी शाहू लॉ कॉलेजच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी राजश्री फुलावती रामचंद्र जालनापूरे यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, स्पर्धा परीक्षांतील कथित गैरप्रकार, वाढते शैक्षणिक शुल्क आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे.

राजश्री जालनापूरे यांनी सांगितले की, २०२२ मध्ये विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत पात्र ठरूनही केवळ वयाचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही न्याय न मिळाल्याने त्यांनी संबंधित अधिकारी, मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच उच्च शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने संघर्ष करत अखेर बार्शी येथील राजर्षी शाहू लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध करण्यासाठी तसेच पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदान आणि पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.

मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात त्यांनी लॉ कॉलेजचे ओळखपत्र (आय-कार्ड) परिधान करून सहभाग घेतला. वयाच्या ६४ व्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages