चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महानगरपालिकेच्या जय भवानी हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी चन्नवीर चिट्टे यांचे व त्यांच्या सर्व सहकारी मित्र परिवाराचे सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद असून वर्षभर सतत सामाजिक कार्यक्रम करत असल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की या सर्व टीमचे यासाठी कौतुक वाटते की त्यांचे कार्यक्रम अनोखे तर असतातच पण विशेष म्हणजे त्यात सातत्य असते. मी शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी जात असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की बरीच लोकं चन्नवीर चिट्टे यांच्या कामाचं आणि त्यांच्या स्वभाचं कौतुक करताना दिसतात. एखाद्याच्या पाठीमागे जर त्यांच्या कामाचं कौतुक होत असेल तर हि खुप अभिमानास्पद बाब आहे. मला आज विषेश आनंद यासाठी होतोत की चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराने आजच्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेची शाळा निवडली आणि इथे शिकणाऱ्या वंचित घटकांच्या मुलांना त्यांनी शैक्षणिक साहित्यांची भेट देवून मुख्यंमत्रांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौडेश्वरी सह. पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमोचे शहर अध्यक्ष विजय कुलते, भिमाशंकर जमादार, मयुर घुगे, बाळासाहेब होमकर, जगदीश यनगुंडी, सतिश पारेल्ली उपस्थित होते. जय भवानी हायस्कूलचे मुख्याध्यापक हरिदास झाडकर यांनी आपल्या भाषणात जय भवानी हायस्कूलच्या दुरावस्तेबाबत भाष्य करत शाळेच्या दुरूस्तीबाबत महापौरांकडे मागणी केली असता महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पू क्षीरसागर, कल्याण करजगी, भाजयुमोचे शहर सचिव श्रीनिवास दासरी, सद्दाम कोसगीकर, रवि शहापूरकर, सोमनाथ कलशेट्टी, करण हलसगी, श्रीनिवास संदुपटला, साईनाथ सज्जे, ओम जमादार, प्रथमेश ताटी, अनिल किरणगी, अभिषेक परबळकर आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर अतनुरे यांनी केले.

No comments:
Post a Comment