पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

 पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा 

समाजसेवक भाई नितीन काळे यांना मिळणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा बहुमान 

२६ जुलैला दिल्लीत मिळणार डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी होणार बहाल 




पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील धडाडीचे समाजसेवक आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य भाई नितीन काळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाची असलेली'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी' (पीएच.डी.) ही मानद पदवी जाहीर झाली आहे. ही पदवी २६जुलै रोजी नवी दिल्ली येथे बहाल करण्यात येणार आहे. यामुळे भाई नितीन काळे यांच्यामुळे पंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात येणार आहे.


रशियातील प्रसिद्ध मॉस्को रिसर्च युनिव्हर्सिटीकडून त्यांना 'सामाजिक कार्य आणि राजकीय प्रशासन' (Social Work and Political Administration) या विषयातील ही डॉक्टरेट बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या सामाजिक कार्याची अधिकृत नोंद जागतिक नोंदवहीत (Global Register) देखील करण्यात आली आहे.भाई नितीन काळे यांनी सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच राजकीय व सामाजिक प्रशासनात पारदर्शकता आणि गतिशीलता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच अविरत संघर्षाची आणि समाजसेवेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.

  या मानाच्या पदवीचे वितरण नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष दिमाखदार सोहळ्यात होणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात देशातील प्रमुख राजकीय नेते, विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे भाई नितीन काळे यांना ही पी एच.डी. मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात येईल. या कार्यक्रमासाठी ते दिल्लीला रवाना होणार आहेत.  जागतिक स्तरावरील हा अत्यंत प्रतिष्ठेचा बहुमान मिळाल्याबद्दल पंढरपूर शहरासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून व राजकीय-सामाजिक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या यशामुळे पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पदवी मिळाल्याबद्दल राज्यातील अनेक आमदार खासदार व मंत्री महोदयांनी काळे यांचे फोन द्वारे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages